Saturday, 25 August 2007

आठवतो तो समुद्र किनारा

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
तू मला भेटायला यायचीस
लाटां सारखं परतून परतून
तू मला मिठीत घ्यायचीस

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
क क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या घराची
वीट मात्र ढासळली नाही

सनिल पांगे

छोट्या छोट्या चारोळ्या

तुफान झेललं
निधड्या छातीनं
सुर्यास ललकारलं
मिणमिणत्या ज्योतीनं

मैफलीत माझ्या
शब्दांचं हत्यार
कवितेतून माझ्या
कापसाचा वार

घाव तो
भरधाव होता
अजूनही शस्त्रास
थोडा वाव होता

कोण कोणाचं
ओझं वाहतो
माखातर
काट्यांवरून जातो

आम्ही काटेचं
बोचणंच माहीत
प्रेम करावं
विचारांसहीत

दगड सुद्धा
ठेच देतो
गुलाब काट्यांकडून
तेच घेतो

नाण्याच्या दोन बाजू
सांगणं जिवनाचं
काट्यांकडून शिकावं
प्रेम असते क्षणाचं

निर्दयी वादळं
शांत होतचं
सुर्याच्या तेजालाही
ग्रहण लागतचं

श्वास कसला
तो दुशीत होता
सुरा तिच्या
कुशीत होता

हातानी पसरावं
घेण्यासाठीच का
देताना हाताला
मुठीचं झाकणचं का????

हव्यास नाही माझी
जे हजारोंचं नि लाखांचं आहे
उपाशी असलो, तरी तेच खातो
जे हक्काचं आहे

इवल्याश्या झोपडीतही
समाधानाच्या ओळी
आलिशान महलातही
पसरवतात झोळी

इथे जिवन
मुखवटे आहे
दगडात शोधतो
तो कुठे आहे

कोणीच नाही
आपलं इथे
प्रेमही पैश्याने
मापलं इथे

@सनिल


शुकशुकाट का रे

कुठे गेले माझे
कवी मित्र सारे
व्यासपीठावर
शुकशुकाट का रे

का शब्द इथे
अवघड झाले
कवितांचेही
पाय जड झाले

भावनांची कुठे
शाई वाळली
कीबोर्ड वर
बोटं अडखळली

रविवारचा दिवस
सुकाच जाणार
बासरीचा सूर
मुकाच जाणार

खेळ खेळाया
का नाहीच कोणी
शब्दांच्या माझ्या
वाहू मीच गोणी

चला तर मग
भेटू कधी तरी
तोवर वाढवतो
पानांची रद्दी तरी

@सनिल




मलाच दिली सोडचिठ्ठी, मी माझ्याच देहात नाही

बरचसं कमवलं तरी, दमडीही खिशात नाही
बरचसं जमवलं तरी, मातीही हातात नाही

कितींदा सरसावले मदतीस हात माझे
लडखडणाऱ्या त्यांनाच, काठीही नशीबात नाही

मनाच्या आभाळात, आठवणींच चांदणं पसरलाय
आज पौर्णिमा तरी, माझा चंद्र नभात नाही

नको संध्याकाळी म्हणूस, शुभंकरोती कल्यानंमं
दिवा जरी हातात, तुळस अंगणात नाही

मी शोधतोय, कोरडे राहण्याचे नाना बहाणे
मग का एखादाही थेंब, तुझ्या ढगात नाही

तुझ्या स्वागता करीता, आतुरलाय घर माझं
नाही अडथळा कसलाच, उंबरठाही दारात नाही

काय मिळवणार आहेस, नव्यानं नातं जोडून
मलाच दिली सोडचिठ्ठी, मी माझ्याच देहात नाही

डोकं आपटून आपटून, दगडही एकदाचा फुटला
ज्याला आजवर शोधला, तो देव दगडात नाही

माझ्या काव्यात सारे, शोधी त्यांच्या जिवन खुणा
तरी आरोप माझ्यावर, वजन शब्दात नाही

@सनिल पांगे

मी साधू संत जगलो

मी साधू संत जगलो, मज कोणी न विचारी का
करताच एक चोरी, सारे कुरवाळी उरी का

मी जिंकतच आलो, द्वेष करी माझा सारे
एकदा चूकून हरलो, मिरवी डोईवरी का

सुखाने ना जगू दिलं, ना दिलं मरूही
हेच ते सुखदु:खाचे, खरे वाटेकरी का

आगीवरच ना, इथे भाजतात भाकरी सारे
एकाचं धान्य श्रेष्ठ म्हणून, दूसरा भिकारी का

फुलण्या ऐवजी जळतात, कसले हे शेजारी
लाकडा ऐवजी हाडं, इथे विकतात वखारी का

एकाच घरात रंगलीय, सप्तसूरांची मैफील
मनसोक्त हसतेय नववधू, रडते म्हातारी का

फिटली सारी देणी, निवांत पडलो लाकडावरी
पेटलो नाही मी, तुझ्या अश्रूंची बाकी उधारी का

किती पीडा या धरतीवर, कोण धावणार मदतीला
पांडुरंगा युगानयुग का, उभाच राहणार विटेवरी का

प्रत्येकाच्या कवितेनं, फुलतो इथे नवा वसंत
आपआपसात उपसतात, शब्दांच्या तलवारी का

हा प्रांत मायावी, ना दया इथे जराही
मी तिष्ठतं उभा, जीव गुदमरतो शहरी का

@सनिल पांगे

नगद रोकडा पाहीजे माल एकदम ताजा आहे

नगद रोकडा पाहीजे
माल एकदम ताजा आहे
ऐ भाव कसला करतोस
काय वाटलं गांजा आहे

डोळे टवकारून काय पाहता
पाहीला नाही का कधी
या वाटेवर, या बाजारात
आला नाहीत का आधी

ऐ सायबा हात दूर ठेव
माल अजून कोवळा आहे
तारुण्याने कणकण भरलेलं
रसरशीत चविष्ट गोळा आहे

नक्की काय साधता तुम्ही
नेत्रसुख घेता नुसतचं पाहून
अतृप्त इच्छा कधी पुर्ण होते
नुसत्याच जिभल्या वाहून

अरे गर्दी कमी करा चला
का धंदा बसवताय माझा
प्रत्येक खिशास कसा परवडणार
विकत घेण्यास "फळांचा राजा"

@सनिल

"उडता पापा" - एक हास्य कविता

हास्य कविता लिहीण्याचा माझा पहीलाच प्रयास आहे..... कविता कशीही जरी वाटली, तरी जरा समजून घ्या....... तसं माझ्यावर आरोप आहे की मी खूप उदास विषयांवर - दु:ख, प्रेत, मृत्यू, वेदना - यांवरच कविता करतो....... म्हणूनच एका वेगळ्या विषयावर लिहीण्याचा प्रयत्न केला आहे...... काही चूक झाल्यास माफी असावी.....

पहिल्या भेटीतच तीने माझा
हात हातात धरलेला
पुढच्या भेटीत कळलं
तो हात खिशात शिरलेला

आधिच माझा खिसा हलका
त्यात तीचा हातही जड
भेटीगाठी वाढत गेल्या, तसं कळलं
तीला शॉपींग व खाण्याची भारी आवड

तीच्या सौंदर्यावर खुश होवून
तीची हर एक इच्छा पुरवली
लिपस्टिकची "चव" चाखतास
तीच्या मेक-अपची काळजी घेतली

हात हातात नव्यांन येत राहीला
तसा त्याचा आकारही बदलला
बहूतेक पगार तीच्यावर खर्च व्हायचा
बाकी कर लादून सरकारानेही वाटा उचललेला

नंतर नंतर ती company म्हणून
मैत्रीणीचा ताफा घेऊन यायची
माझ्या पैशांवर ताव मारून, प्रत्येकजणी
मला "उडता पापा" देऊन जायची

प्रत्येकीचे "उडता पापा" मोठ्या हौशीने
मी मनाच्या तिजोरीत जपत गेलो
पैशांने जरी कंगाल झालो, तरी
हृदयाने श्रीमंत होत गेलो

शॉपींग, लिपस्टिक, उडता पापा
जिवनाचा नित्य, नियमीत कार्यक्रम होता
माझ्यावर किती प्रेम करते ती
माझ्या मनाचा खोटा भ्रम होता

अचानक मग एक दिवस तीला
माझा सहवास अजिर्ण वाटू लागला
म्हणे माझ्याहून मोठा दानशूर
तिला राजबिंड कर्ण भेटू लागला

कधी कळलचं नाही, का व कसा
तीच्या जिवनातून मी वजा होत गेलो
खिसा पुन्हा भरू लागला, पण
मी स्व:तास सजा देत गेलो

कित्येक वर्षाने अचानक, ती एका
लहाण मुलासवे चालताना भेटली
"मामा" कडून मोठी कॅडबरी घ्यायची हं
मला डोळा मारून मुलाला पुटपुटली

आयुष्य हे असचं असतं
कधी वळण घेतं कळतचं नाही
प्रेमात मामाही का बनावं लागतं
अशी कितीतरी कोडी उलगडतचं नाही

@सनिल पांगे

"उडता पापा" - एक हास्य कविता

हास्य कविता लिहीण्याचा माझा पहीलाच प्रयास आहे..... कविता कशीही जरी वाटली, तरी जरा समजून घ्या....... तसं माझ्यावर आरोप आहे की मी खूप उदास विषयांवर - दु:ख, प्रेत, मृत्यू, वेदना - यांवरच कविता करतो....... म्हणूनच एका वेगळ्या विषयावर लिहीण्याचा प्रयत्न केला आहे...... काही चूक झाल्यास माफी असावी.....

पहिल्या भेटीतच तीने माझा
हात हातात धरलेला
पुढच्या भेटीत कळलं
तो हात खिशात शिरलेला

आधिच माझा खिसा हलका
त्यात तीचा हातही जड
भेटीगाठी वाढत गेल्या, तसं कळलं
तीला शॉपींग व खाण्याची भारी आवड

तीच्या सौंदर्यावर खुश होवून
तीची हर एक इच्छा पुरवली
लिपस्टिकची "चव" चाखतास
तीच्या मेक-अपची काळजी घेतली

हात हातात नव्यांन येत राहीला
तसा त्याचा आकारही बदलला
बहूतेक पगार तीच्यावर खर्च व्हायचा
बाकी कर लादून सरकारानेही वाटा उचललेला

नंतर नंतर ती company म्हणून
मैत्रीणीचा ताफा घेऊन यायची
माझ्या पैशांवर ताव मारून, प्रत्येकजणी
मला "उडता पापा" देऊन जायची

प्रत्येकीचे "उडता पापा" मोठ्या हौशीने
मी मनाच्या तिजोरीत जपत गेलो
पैशांने जरी कंगाल झालो, तरी
हृदयाने श्रीमंत होत गेलो

शॉपींग, लिपस्टिक, उडता पापा
जिवनाचा नित्य, नियमीत कार्यक्रम होता
माझ्यावर किती प्रेम करते ती
माझ्या मनाचा खोटा भ्रम होता

अचानक मग एक दिवस तीला
माझा सहवास अजिर्ण वाटू लागला
म्हणे माझ्याहून मोठा दानशूर
तिला राजबिंड कर्ण भेटू लागला

कधी कळलचं नाही, का व कसा
तीच्या जिवनातून मी वजा होत गेलो
खिसा पुन्हा भरू लागला, पण
मी स्व:तास सजा देत गेलो

कित्येक वर्षाने अचानक, ती एका
लहाण मुलासवे चालताना भेटली
"मामा" कडून मोठी कॅडबरी घ्यायची हं
मला डोळा मारून मुलाला पुटपुटली

आयुष्य हे असचं असतं
कधी वळण घेतं कळतचं नाही
प्रेमात मामाही का बनावं लागतं
अशी कितीतरी कोडी उलगडतचं नाही

@सनिल पांगे

प्रिय मनास


माझ्या "प्रिय मनास" -- ह्या चारोळी संग्रहातील काही निवडक चारोळ्या.

आठवतो आपला श्वास जसा
एकमेकांत मिसळला होता
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता

वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर
इतकं दुःख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला, पण
यापुढे त्यांना पोसावं लागेल

तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली
पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली

'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

झ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझं दुःख बघवलं नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे

शेवटी सारे त्याचीच लेकरे
काहींना निवडून तो दु:ख पेरत नाही
दु:ख सुद्धा श्रीमंत व गरीब
असा भेदभाव करत नाही

देवाला प्रसन्न करण्यासाठी
आपणं पंचपक्वांनांचं ताट वाढतो
रं तर, श्रद्धेच्या म्यानातून
आपण अपेक्षांची तलवार काढतो

गुंततचं गेलो तुझात मी
पण मन ना तू माझं पाहीलं
ज तुझात असा गुंतलो
चार खांद्यानं माझं ओझं वाहीलं

फुलांनाही तू जवळ करू नकोस
भरोसा नाही त्यांचा मनाचा
चुकून स्पर्श करशील ओठांनी, पण
फायदा घेतील ते तुझ्या भोळेपणाचा

वाटतं सर्वांच्या देखत तुला
स्वत:चं करावं सन्मानानं
आणि अलगद तुझ्या नावापुढे
माझ्या आडनावानं शिरावं अभिमानानं

आजं कळलं तुझ्याविणा आयुष्य
लतं बोलतं तरीही बधीर आहे
बधीर म्हणून खरं तर चुकलो
श्वास फुंकणारं मृत शरीर आहे

हृदय तुझ्याकडे सोपवत आहे
तू ठरव कशी पर्वा करायची
गवत समझून पायदली तुडवायचं
का चरणी वाहून दुर्वा करायची

@सनिल पांगे

ओळखलं तिने मला - जागच्या जागी ती स्तब्द झाली

नुकतास मी
नदीवर जाऊन आलो
डोळ्यात साठलेलं एक तळं
अगदी थेंब थेंब पिळून आलो

वेळ होती ती किर्र रात्रीची
तरी नदीला भरती आली
तिलाच कळले नाही
कोणाची वेदना वरती आली

बांध तोडून काठाचा
ती गावभर फिरू लागली
माझा शोध घेण्यासाठी
हरेक घरात शिरू लागली

तिला ही पहायचं होते
कोणाचे इतके दु:खी घर होते
मीही मिसळते सागराशी
पण कुठे त्याची पातळी वर येते

माझ्या घरापाशी ती येताच
एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला
मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी
माझ्या गळलेला थेंब जुळाला

ओळखलं तिने मला
जागच्या जागी ती स्तब्द झाली
नजर माझ्याशी मिळताचं
स्व:तास म्हणू लागली अभागी

म्हणाली, आजवर माझा समज होता
जगातली सर्वात दु:खी मीच आहे
पण, तुझ्याशी मापल्यावर कळलं
माझे दु:ख किती कमीच आहे

रोज स्व:तास बुडवते सागरात
पण कधी कुठे फरक पडला
तू एकदाच दु:ख जाहीर केलसं
माझ्या अंतकर्णातून पूर आला

मी म्हणालो.....

आपल्याहून सुखी जणांकडे पाहीलं
की आपणास आपण दु:खी वाटतो
आपल्याहून दु:खी जणांकडे पाहण्याचा
आपण प्रयत्नच कुठे करतो

जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही
तोपर्यंत हे असचं चालणार
सुख-समाधानात नांदणारा
हीमी दु:खी आहे असचं बोलणार

@सनिल पांगे

Friday, 24 August 2007

तुझ्या डोळ्यांतील मोती माझ्या ओठांनी टिपला

तुझ्या डोळ्यांतील मोती
माझ्या ओठांनी टिपला
काही क्षणांसाठी
ओठ झालेत शिंपला

स्वर्गाचा ठाव जीतेपणी घेत
पाय उठले जमनीवरी
चांदण्यांच्या शोधात मी
तरंगत सुटलो अधांतरी

स्तब्द, सारं स्तब्द झालं
मी भावनांच्या कुशीत निजत गेलो
स्वप्नांच्या असंख्य सरीत
मी बेभान मनसोक्त भिजत गेलो

वाटलं ओठांनी सदैव असं
मोती टिपत रहावं
तुझ्या गालावरच्या समुद्रावर
फक्त त्यांचचं साम्राज्य असावं

अरेरे हे काय माझ्या मनात
किती माझी ही कपटी वृत्ती
शिंपला होण्याच्या नादात
तुला रडवण्याची प्रवृती

छे छे हे नक्कीच प्रेम नाही
त्यात फक्त स्वार्थ दडलाय
जिने माझ्यावर जीव लावला
मी तिच्याच प्रेमाचा अर्थ खुडला

यदु:ख असय्य झालं तसं
माझ्या डोळ्यात ढग दाटु लागले
तुझ्या मिठीच्या आकाशगंगेत येताच
माझ्या डोळ्यातून नक्षत्र तुटू लागले

भाग्याचं पारडं अचानक
तुझ्या दिशेला झुकू लागले
माझ्या डोळ्यातले रत्न तुझ्या
ओठांच्या शिंपल्यात लुकलुकू लागले

क्षणांचा झोका हलत राहतो
धी ह्या, तर कधी त्या दिशेला
आपल्याला मात्र जावं लागतं
आयुष्यात निरनिराळ्या परीक्षेला

खरचं मन जे विचार करतं
त्येकक्षात कधी घडत नाही
भाग्याला मान्य असतं
तसं स्वप्नही आपल्याला पडत नाही

@सनिल

Wednesday, 22 August 2007

कोण, कधी, कसं, कुठे - जिवन आपलं घडवत असतं

माझा एक मित्र आहे, श्री. अभी जोशी नावाचा, तशी आमची ओळख ओर्कुट वरचं झाली. व्यवसायाने अभी डॉक्टर आहे, पण महाशय म्हणतो की तो "पक्का मैफीलीतला माणुस" आहे. अभीने एक गोष्ट मला स्क्रप केली, जी माझ्या मनात घर करून राहीली. आज त्याच गोष्टीला मी एक कवितेचं रुप देण्याचा प्रयत्न करतो आहे. अभी मला खात्री आहे तुला नक्की आवडेल माझा हा प्रयत्न.


दु:खाच्या विळख्यातून, सुख साधाया निघाला
एकदा एक माणूस, हास्य शोधाया निघाला

अडखळला एका दगडाशी, खरी सुरूवात झाली
त्याच्या व दगडाच्या स्पर्शाची तिथूनच खैरात झाली

गळयातील लोखंडी साखळीचा, स्पर्श दगडाशी करायचा
जमेल तेव्हा, झेपेल तितके, नित्याने दगड फेकायचा

दिवस गेले, महीने लोटले, वर्षही गेलीत निघून
कितीतरी दगड त्याच्या साखळीशी गेले स्पर्षून

त्याच्या ह्या नित्य कार्यक्रमात, व्यक्तय कधी न आलेला
दूरवर दगड फेकताना, त्याने कंटाला कधी न केलेला

हास्याच्या शोधात निघालेला एकदाचा बिचारा थकला
शरीराचा भार पेलवला नाही तसा तो मग कोलमडला

पडता पडता सहजच नजर, गळ्यातील साखळीवर गेली
आश्चर्यचकीत झाला तीला पाहून सोन्याची ती झालेली

सारांश,

आईच्या रुपात, वडिलांच्या देखरीखित
भावंडांच्या सहवासात, शिक्षकांच्या छायेत
मित्र-मैत्रीनीच्या संगतीत, मुलांच्या हास्यात
मोठ्यांच्या आशीर्वादात, जिवनसाथीच्या मायेत

कोण, कधी, कसं, कुठे,
जिवन आपलं घडवत असतं
आपल्यातल्या लोखंडाला कळत नकळत
सोनं बनवण्यासाठी धडपडत असतं

@सनिल पांगे

इच्छेच्या ओंजळीत, का जमवतेस आशेची फुले


कधीचा पळतोय, मला दिशा माहीत नाही
आयुष्य गिळतोय, परिभाषा माहीत नाही

भास्करा तूही विसरलास का पुर्वेची वाट
अंधार छळतोय, मला निशा माहीत नाही

स्वप्न का पाहतेस उज्वल भविष्याचे
तुझ्या हातावरच्या, तुलाच रेषा माहीत नाही

का मागतेस देवाकडे, सात जन्मांसाठी मला
ह्या जन्माचा, का तुला तमाशा माहीत नाही

इच्छेच्या ओंजळीत, का जमवतेस आशेची फुले
नशीबाला पडलेल्या भोकांची, दशा माहीत नाही

मी कधी घेतली, पाय कधी पडले वाकडे
रस्ताच नव्हता सरळ, मला नशा माहीत नाही

मृत्यु तूही का, नेहमीच लपंडाव खेळतो
समाझ्या जिवनाची, तुला दुर्दशा माहीत नाही
माझ्या दु:खावर, जग सांडी मुक्त हास्य फुले
वेदनांची कोणालाच, का इथे भाषा माहीत नाही

@सनिल पांगे

"valentine day" - नभ रंगाने उधळून जाऊ दे - 1

प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
ज्याला कुठेच अंत नाही
प्रेमाखातर प्राणही गेला
तरी मनाला त्याची खंत नाही

प्रेम म्हणजे बंधन
प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून
इतरांसाठी सुवासणारं चंदन

कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला कधी कधी
ती भेटचं घडावी लागत नाही

प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो

प्रेम म्हणजे प्रियजणांच्या
चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो

प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी
जी हृदयात अवचित पेट घेते
जीवनाच्या एका नाजूक वळणावर
अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते

प्रेम म्हणजे क्षितीज
मिलन दोन मनांचं
म म्हणजे ते शिखर
दोन जिवांच्या आपलेपणाचं

प्रेम म्हणजे दोन मनांचा सेतू
जो भवनांशिवाय बांधता येत नाही
प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन
नुसतं स्पर्शानेच साधता येत नाही

प्रेम म्हणजे आठवणीत वाहणं
म्हणजे विचारात राहणं
प्रेम म्हणजे कल्पनेच्या नजरेतून
स्वप्नांचं रम्य विश्व पाहणं

प्रेम म्हणजे वहीत एखादं
गुलाब जपून ठेवलेलं
प्रेम म्हणजे मनात एखादं
प्रतिबिंब लपून ठेवलेलं

प्रेम म्हणजे सुरळीत मार्गावरही
वलांचं अचानक अडखळणं
प्रेम म्हणजे झोपेत अलगद
उशीला हळूच कुरवाळणं

प्रेमात हे असचं असतं
भाषणाचा भार डोळे पेलत असतात
ओठ जरी स्थिर राहिले
तरी डोळे मात्र बोलत असतात

"valentine day" - नभ रंगाने उधळून जाऊदे"

valentine day" तरूणांचा सणा-सुधीचा दिवस. हा दिवस गोड करण्यासाठी माझा एक संपुर्न चारोळी संग्रह ("प्रेमाचा इंद्रधनू) तुमच्या करीता पोस्ट करत आहे. आशा करतो तुमचा हा दिवस नक्कीच गोड जाईल. चला मग माझ्या ह्या इंद्रधनूच्या रंगात, तुम्ही तुमच्याही कवितेचे रंग मिसळा. आसमंती असा एक इंद्रधनू कोरूया की कवितेचं नभ रंगाने उधळून जाऊदे. "प्रेमाचा इंद्रधनू"

जिवनाच्या एका नाजूक वळणावर
भावनांच्या सागराला प्रलय येतो
प्रत्येकाच्या जिवनात कधी ना कधी
"प्रेमाच्या इंद्रधनूचा" उदय होतो

प्रेम म्हणजे भावनांच्या आकाशात
उत्तुंग मारलेली भरारी असते
स्वप्नांच्या विश्वात अधांतरी तरंगताना
नकळतच हृदयचं फरारी असते

प्रेमात हवी फक्त एक नजरभेट
स्वप्नांचे झोके झुलण्यासाठी
अवचित हलकेच स्मित हास्य
अक्षतांचं चांदणं झेलण्यासाठी

प्रेम म्हणजे भावनांपुढे
विचारांनी हार स्विकारलेली
प्रेम म्हणजे मनापुढे
दूने शरणागती पत्करलेली

ठराविक व्यक्तीवर प्रेम करायचं
असं कधी ठरवायचं नसतं
प्रेमाचय रणभूमीवर फक्त
हृदय हरवायचं असतं

प्रेम म्हणजे रात्रभर
स्वप्नांचे झुलणारे झोके
प्रेम म्हणजे नाजूक स्पर्शाने
हृद्याचे वाढणारे ठोके

प्रेम म्हणजे संकटातही
पाठीशी उभी राहणारी स्फूर्ती
प्रेम म्हणजे मनाच्या मंदिरात
हाडामासाची पुजलेली मूर्ती

प्रेम म्हणजे कुंकुवाच्या रूपात
कपाळावर सौभाग्याचं रूजणं
प्रेम म्हणजे मंजळसुत्राच्या रूपात
गळ्याभोवती विश्वासाचं सजणं

प्रेम म्हणजे वेडं होणं
गर्दीत सुद्धा एकटं वाटणं
दूर कुठेतरी आकाशात
भावनांच्या चांदण्यांचं दुकान थाटणं

प्रेम म्हणजे भावनांचा समुद्र
ओहोटीचा नसून फक्त भरतीचा
प्रेम म्हणजे हृदयाचा तो प्रवास
मार्ग नाही जिथे परतीचा

खऱ्या प्रेमाचा अर्थ
खरचं किती खोल असतो
एकाच्या डोळ्यात इवलासा अश्रू
दुसऱ्यासाठी प्राणांहून अनमोल असतो

प्रेम म्हणजे प्रियजणांच्या सहवासात
मिळणारी शीतल छाया असते
तर कधी आईच्या कुशीत
फुलणारी वेडी माया असते

प्रेम ह्या दोन अक्षरातच
जीवनाचा खरा अर्थ दडला आहे
त्या अर्थाच्या शोधातच तर
एक जीव दुसऱ्यावर जडला आहे

प्रेम असं बंधन आहे
जे कोणासही चुकलं नाही
असं एकही हृदय नाही जिथे
प्रेमाचं चांदणं लुकलुकलं नही

प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम कधी ठरते शिक्षा
प्रेम म्हणजे पतिव्रता सीतेनी
दिलेली अग्नी परीक्षा

खरं प्रेम एकदाच होतं
ते कधीही विसरता येत नाही
शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ
अनेकांवर पसरता येत नाही

प्रेम हे असचं असतं
थोडसं हसवतं, थोडसं रडवतं
कधी शून्यात आणून सोडतं
तर कधी शून्यातून विश्व घडवतं

"प्रेम" .... शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

संसाराची अजून ठीगळ्यांवर मदार नाही.

नातं जरी पारदर्शक, आरपार नाही
बघ अजूनही उद्धवस्त संसार नाही

खेचातानीत जरी खुप नुकसान झालं
संसाराची अजून ठीगळ्यांवर मदार नाही

तू गुंफ विश्वासाने नव्या स्पप्नांची फुले
भावनांच्या अजून मी दूर फार नाही

घाल गळ्याभोवती, हार तुझ्या हातांचा
त्याहून सुंदर गळ्यासाठी अलंकार नाही

ये मिठीत, जशी पहील्यांदा आली होतीस
मिठीत उबेची, कमी झाली धार नाही
सांग हळूच कानात, जे आहे मनात
फुटक्या नशीबाशी माझा आज करार नाही

@सनिल

मी केंद्रबिंदू आकाशगंगेचा

ना मी पूर्वेचा, ना पच्छिमेचा
माझा प्रवास दाही दीशेचा
ना मी उत्तरेचा, ना दक्षिणेचा
मी केंद्रबिंदू आकाशगंगेचा

ना मी धरतीचा, ना आभाळाचा
मी चुंबन त्या क्षतिजरेषाचा
ना मी गर्भातला,ना सरणावरचा
मी आत्मा शरिरातल्या गणवेशाचा

ना मी भावनांचा, ना विचारांचा
मी खेळ खंडोबा तुमच्या कल्पनांचा
ना मी वर्तमानाचा, ना भूताचा
मी एक दुवा हरेक काळांचा

ना मी आशेचा, ना निराशेचा
मी तर भोग तुमच्या कर्माचा
ना मी ह्या जातीचा, ना त्या जमातीचा
मी तर इतिहास मनुष्य धर्माचा

ना मी भरतीचा, ना आहोटीचा
मी शांतता सागराच्या खोल पातळीतली
ना मी आगीचा, ना मी धूरांचा
मी ज्वालामुखी पृथ्वीच्या पोटातली

ना मी अमका, ना मी तमका
मी तर श्वास प्रत्येक मनांचा
ना मी चंद्राचा, ना चांदण्यांचा
मी जगतो ते भारवलेल्या क्षणांचा

@सनिल पांगे