Saturday 25 August 2007

मलाच दिली सोडचिठ्ठी, मी माझ्याच देहात नाही

बरचसं कमवलं तरी, दमडीही खिशात नाही
बरचसं जमवलं तरी, मातीही हातात नाही

कितींदा सरसावले मदतीस हात माझे
लडखडणाऱ्या त्यांनाच, काठीही नशीबात नाही

मनाच्या आभाळात, आठवणींच चांदणं पसरलाय
आज पौर्णिमा तरी, माझा चंद्र नभात नाही

नको संध्याकाळी म्हणूस, शुभंकरोती कल्यानंमं
दिवा जरी हातात, तुळस अंगणात नाही

मी शोधतोय, कोरडे राहण्याचे नाना बहाणे
मग का एखादाही थेंब, तुझ्या ढगात नाही

तुझ्या स्वागता करीता, आतुरलाय घर माझं
नाही अडथळा कसलाच, उंबरठाही दारात नाही

काय मिळवणार आहेस, नव्यानं नातं जोडून
मलाच दिली सोडचिठ्ठी, मी माझ्याच देहात नाही

डोकं आपटून आपटून, दगडही एकदाचा फुटला
ज्याला आजवर शोधला, तो देव दगडात नाही

माझ्या काव्यात सारे, शोधी त्यांच्या जिवन खुणा
तरी आरोप माझ्यावर, वजन शब्दात नाही

@सनिल पांगे

No comments: