Saturday 25 August 2007

आठवतो तो समुद्र किनारा

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
तू मला भेटायला यायचीस
लाटां सारखं परतून परतून
तू मला मिठीत घ्यायचीस

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
क क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या घराची
वीट मात्र ढासळली नाही

सनिल पांगे

No comments: