Saturday 25 August 2007

छोट्या छोट्या चारोळ्या

तुफान झेललं
निधड्या छातीनं
सुर्यास ललकारलं
मिणमिणत्या ज्योतीनं

मैफलीत माझ्या
शब्दांचं हत्यार
कवितेतून माझ्या
कापसाचा वार

घाव तो
भरधाव होता
अजूनही शस्त्रास
थोडा वाव होता

कोण कोणाचं
ओझं वाहतो
माखातर
काट्यांवरून जातो

आम्ही काटेचं
बोचणंच माहीत
प्रेम करावं
विचारांसहीत

दगड सुद्धा
ठेच देतो
गुलाब काट्यांकडून
तेच घेतो

नाण्याच्या दोन बाजू
सांगणं जिवनाचं
काट्यांकडून शिकावं
प्रेम असते क्षणाचं

निर्दयी वादळं
शांत होतचं
सुर्याच्या तेजालाही
ग्रहण लागतचं

श्वास कसला
तो दुशीत होता
सुरा तिच्या
कुशीत होता

हातानी पसरावं
घेण्यासाठीच का
देताना हाताला
मुठीचं झाकणचं का????

हव्यास नाही माझी
जे हजारोंचं नि लाखांचं आहे
उपाशी असलो, तरी तेच खातो
जे हक्काचं आहे

इवल्याश्या झोपडीतही
समाधानाच्या ओळी
आलिशान महलातही
पसरवतात झोळी

इथे जिवन
मुखवटे आहे
दगडात शोधतो
तो कुठे आहे

कोणीच नाही
आपलं इथे
प्रेमही पैश्याने
मापलं इथे

@सनिल


No comments: