Wednesday 22 August 2007

"valentine day" - नभ रंगाने उधळून जाऊ दे - 1

प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
ज्याला कुठेच अंत नाही
प्रेमाखातर प्राणही गेला
तरी मनाला त्याची खंत नाही

प्रेम म्हणजे बंधन
प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून
इतरांसाठी सुवासणारं चंदन

कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला कधी कधी
ती भेटचं घडावी लागत नाही

प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो

प्रेम म्हणजे प्रियजणांच्या
चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो

प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी
जी हृदयात अवचित पेट घेते
जीवनाच्या एका नाजूक वळणावर
अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते

प्रेम म्हणजे क्षितीज
मिलन दोन मनांचं
म म्हणजे ते शिखर
दोन जिवांच्या आपलेपणाचं

प्रेम म्हणजे दोन मनांचा सेतू
जो भवनांशिवाय बांधता येत नाही
प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन
नुसतं स्पर्शानेच साधता येत नाही

प्रेम म्हणजे आठवणीत वाहणं
म्हणजे विचारात राहणं
प्रेम म्हणजे कल्पनेच्या नजरेतून
स्वप्नांचं रम्य विश्व पाहणं

प्रेम म्हणजे वहीत एखादं
गुलाब जपून ठेवलेलं
प्रेम म्हणजे मनात एखादं
प्रतिबिंब लपून ठेवलेलं

प्रेम म्हणजे सुरळीत मार्गावरही
वलांचं अचानक अडखळणं
प्रेम म्हणजे झोपेत अलगद
उशीला हळूच कुरवाळणं

प्रेमात हे असचं असतं
भाषणाचा भार डोळे पेलत असतात
ओठ जरी स्थिर राहिले
तरी डोळे मात्र बोलत असतात

No comments: