Saturday 25 August 2007

"उडता पापा" - एक हास्य कविता

हास्य कविता लिहीण्याचा माझा पहीलाच प्रयास आहे..... कविता कशीही जरी वाटली, तरी जरा समजून घ्या....... तसं माझ्यावर आरोप आहे की मी खूप उदास विषयांवर - दु:ख, प्रेत, मृत्यू, वेदना - यांवरच कविता करतो....... म्हणूनच एका वेगळ्या विषयावर लिहीण्याचा प्रयत्न केला आहे...... काही चूक झाल्यास माफी असावी.....

पहिल्या भेटीतच तीने माझा
हात हातात धरलेला
पुढच्या भेटीत कळलं
तो हात खिशात शिरलेला

आधिच माझा खिसा हलका
त्यात तीचा हातही जड
भेटीगाठी वाढत गेल्या, तसं कळलं
तीला शॉपींग व खाण्याची भारी आवड

तीच्या सौंदर्यावर खुश होवून
तीची हर एक इच्छा पुरवली
लिपस्टिकची "चव" चाखतास
तीच्या मेक-अपची काळजी घेतली

हात हातात नव्यांन येत राहीला
तसा त्याचा आकारही बदलला
बहूतेक पगार तीच्यावर खर्च व्हायचा
बाकी कर लादून सरकारानेही वाटा उचललेला

नंतर नंतर ती company म्हणून
मैत्रीणीचा ताफा घेऊन यायची
माझ्या पैशांवर ताव मारून, प्रत्येकजणी
मला "उडता पापा" देऊन जायची

प्रत्येकीचे "उडता पापा" मोठ्या हौशीने
मी मनाच्या तिजोरीत जपत गेलो
पैशांने जरी कंगाल झालो, तरी
हृदयाने श्रीमंत होत गेलो

शॉपींग, लिपस्टिक, उडता पापा
जिवनाचा नित्य, नियमीत कार्यक्रम होता
माझ्यावर किती प्रेम करते ती
माझ्या मनाचा खोटा भ्रम होता

अचानक मग एक दिवस तीला
माझा सहवास अजिर्ण वाटू लागला
म्हणे माझ्याहून मोठा दानशूर
तिला राजबिंड कर्ण भेटू लागला

कधी कळलचं नाही, का व कसा
तीच्या जिवनातून मी वजा होत गेलो
खिसा पुन्हा भरू लागला, पण
मी स्व:तास सजा देत गेलो

कित्येक वर्षाने अचानक, ती एका
लहाण मुलासवे चालताना भेटली
"मामा" कडून मोठी कॅडबरी घ्यायची हं
मला डोळा मारून मुलाला पुटपुटली

आयुष्य हे असचं असतं
कधी वळण घेतं कळतचं नाही
प्रेमात मामाही का बनावं लागतं
अशी कितीतरी कोडी उलगडतचं नाही

@सनिल पांगे

No comments: