Friday 24 August 2007

तुझ्या डोळ्यांतील मोती माझ्या ओठांनी टिपला

तुझ्या डोळ्यांतील मोती
माझ्या ओठांनी टिपला
काही क्षणांसाठी
ओठ झालेत शिंपला

स्वर्गाचा ठाव जीतेपणी घेत
पाय उठले जमनीवरी
चांदण्यांच्या शोधात मी
तरंगत सुटलो अधांतरी

स्तब्द, सारं स्तब्द झालं
मी भावनांच्या कुशीत निजत गेलो
स्वप्नांच्या असंख्य सरीत
मी बेभान मनसोक्त भिजत गेलो

वाटलं ओठांनी सदैव असं
मोती टिपत रहावं
तुझ्या गालावरच्या समुद्रावर
फक्त त्यांचचं साम्राज्य असावं

अरेरे हे काय माझ्या मनात
किती माझी ही कपटी वृत्ती
शिंपला होण्याच्या नादात
तुला रडवण्याची प्रवृती

छे छे हे नक्कीच प्रेम नाही
त्यात फक्त स्वार्थ दडलाय
जिने माझ्यावर जीव लावला
मी तिच्याच प्रेमाचा अर्थ खुडला

यदु:ख असय्य झालं तसं
माझ्या डोळ्यात ढग दाटु लागले
तुझ्या मिठीच्या आकाशगंगेत येताच
माझ्या डोळ्यातून नक्षत्र तुटू लागले

भाग्याचं पारडं अचानक
तुझ्या दिशेला झुकू लागले
माझ्या डोळ्यातले रत्न तुझ्या
ओठांच्या शिंपल्यात लुकलुकू लागले

क्षणांचा झोका हलत राहतो
धी ह्या, तर कधी त्या दिशेला
आपल्याला मात्र जावं लागतं
आयुष्यात निरनिराळ्या परीक्षेला

खरचं मन जे विचार करतं
त्येकक्षात कधी घडत नाही
भाग्याला मान्य असतं
तसं स्वप्नही आपल्याला पडत नाही

@सनिल

No comments: