Wednesday 22 August 2007

कोण, कधी, कसं, कुठे - जिवन आपलं घडवत असतं

माझा एक मित्र आहे, श्री. अभी जोशी नावाचा, तशी आमची ओळख ओर्कुट वरचं झाली. व्यवसायाने अभी डॉक्टर आहे, पण महाशय म्हणतो की तो "पक्का मैफीलीतला माणुस" आहे. अभीने एक गोष्ट मला स्क्रप केली, जी माझ्या मनात घर करून राहीली. आज त्याच गोष्टीला मी एक कवितेचं रुप देण्याचा प्रयत्न करतो आहे. अभी मला खात्री आहे तुला नक्की आवडेल माझा हा प्रयत्न.


दु:खाच्या विळख्यातून, सुख साधाया निघाला
एकदा एक माणूस, हास्य शोधाया निघाला

अडखळला एका दगडाशी, खरी सुरूवात झाली
त्याच्या व दगडाच्या स्पर्शाची तिथूनच खैरात झाली

गळयातील लोखंडी साखळीचा, स्पर्श दगडाशी करायचा
जमेल तेव्हा, झेपेल तितके, नित्याने दगड फेकायचा

दिवस गेले, महीने लोटले, वर्षही गेलीत निघून
कितीतरी दगड त्याच्या साखळीशी गेले स्पर्षून

त्याच्या ह्या नित्य कार्यक्रमात, व्यक्तय कधी न आलेला
दूरवर दगड फेकताना, त्याने कंटाला कधी न केलेला

हास्याच्या शोधात निघालेला एकदाचा बिचारा थकला
शरीराचा भार पेलवला नाही तसा तो मग कोलमडला

पडता पडता सहजच नजर, गळ्यातील साखळीवर गेली
आश्चर्यचकीत झाला तीला पाहून सोन्याची ती झालेली

सारांश,

आईच्या रुपात, वडिलांच्या देखरीखित
भावंडांच्या सहवासात, शिक्षकांच्या छायेत
मित्र-मैत्रीनीच्या संगतीत, मुलांच्या हास्यात
मोठ्यांच्या आशीर्वादात, जिवनसाथीच्या मायेत

कोण, कधी, कसं, कुठे,
जिवन आपलं घडवत असतं
आपल्यातल्या लोखंडाला कळत नकळत
सोनं बनवण्यासाठी धडपडत असतं

@सनिल पांगे

No comments: