Saturday 25 August 2007

प्रिय मनास


माझ्या "प्रिय मनास" -- ह्या चारोळी संग्रहातील काही निवडक चारोळ्या.

आठवतो आपला श्वास जसा
एकमेकांत मिसळला होता
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता

वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर
इतकं दुःख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला, पण
यापुढे त्यांना पोसावं लागेल

तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली
पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली

'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

झ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझं दुःख बघवलं नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे

शेवटी सारे त्याचीच लेकरे
काहींना निवडून तो दु:ख पेरत नाही
दु:ख सुद्धा श्रीमंत व गरीब
असा भेदभाव करत नाही

देवाला प्रसन्न करण्यासाठी
आपणं पंचपक्वांनांचं ताट वाढतो
रं तर, श्रद्धेच्या म्यानातून
आपण अपेक्षांची तलवार काढतो

गुंततचं गेलो तुझात मी
पण मन ना तू माझं पाहीलं
ज तुझात असा गुंतलो
चार खांद्यानं माझं ओझं वाहीलं

फुलांनाही तू जवळ करू नकोस
भरोसा नाही त्यांचा मनाचा
चुकून स्पर्श करशील ओठांनी, पण
फायदा घेतील ते तुझ्या भोळेपणाचा

वाटतं सर्वांच्या देखत तुला
स्वत:चं करावं सन्मानानं
आणि अलगद तुझ्या नावापुढे
माझ्या आडनावानं शिरावं अभिमानानं

आजं कळलं तुझ्याविणा आयुष्य
लतं बोलतं तरीही बधीर आहे
बधीर म्हणून खरं तर चुकलो
श्वास फुंकणारं मृत शरीर आहे

हृदय तुझ्याकडे सोपवत आहे
तू ठरव कशी पर्वा करायची
गवत समझून पायदली तुडवायचं
का चरणी वाहून दुर्वा करायची

@सनिल पांगे

No comments: