Sunday 18 May 2008

***अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे***

.
मला सजवण्या मागे, तुमचा काय बेत आहे
माझ्या शरीराचा कोणता, अर्थ अभिप्रेत आहे


फुल होऊन आतास, कुठे मी फुलू पाहतो
कोण चार खांद्यावरुन, मला असं नेत आहे


कधी ज्यांच्यासाठी मी, त्यांचं दूनिया होतो
मला एकटं सोडताना, ते कोणत्या दुनियेत आहे


आजवर प्रत्येकाला, मी आधारच देत आलो
मग माझा भार का, असा लाकडावर येत आहे


ज्यांच्या पोटापाण्यासाठी, मी वणवण फिरलो
माझ्या भोवती फिरून, का तोंडात पाणी टाकत आहे


तेवलो मी त्यांच्यासाठी, प्रकाश मिळावा म्हणून
अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे


मला नाही पटलं माझ्याच आप्तेष्टांचं वागणं
सरणावरून उठलो, तर म्हणे भूतप्रेत आहे


मातीचा लगाव मला, शेवटी मातीतच मिसळलो
थोडाफार जे उरलो, ती राख गंगेत आहे


आठवण माझी येताच, नजर फिरवा आभाळभर
असंख्य रुपात लुकलुकत, मी त्याच्या कवेत आहे


समजू नका मी गेलो, आहे अजून तुमच्यातच
मरणावरच्या प्रत्येक कवितेत, जिवंत भूमिकेत आहे


प्रत्येक जबाबदारी मी, यशस्वी रित्या पार पाडली
माझी जबाबदारी त्यांच्यावर, मी कोणत्या भूमिकेत आहे


जन्मापासून कोणी पुढे, तर कोणी मागे आहे उभं
आज मी एकटाच, मी नक्की कोणत्या रांगेत आहे

@ सनिल पांगे

7 comments:

Anand Kale said...

Maranala Jinkalas...
Mast kavita aahe sanilda

मी रेश्मा said...

jabardast kavita Sanil da..
tuzya kavitela comments dyayala mazyakade shabch nahiyet...

Anonymous said...

Chhan kavita ahe.

btw,
tumachya blog cha naav "shabdanchyakathi.." jara chhoTa kara na please.. tyachyamuLe www.marathiblog.net cha formatting bighaDataye.

meghana.

Anonymous said...

i mean,
www.marathiblogs.net

आनंद said...

WA SANILDA
TULA JAWAB NAHI
TUJHYA KADE TAR SHABDANCHE BHANDAR AAHE

Anonymous said...

Jinkalas mitra...
kharach,Jinkalas...

Straight Bend said...

Good Ghazal.