Saturday 17 May 2008

*****स्वप्नांचा धरीशी पदर कुठवर****

तुझा माझ्यात वावर कुठवर
प्रेम झाले अनावर कुठवर


वणवा होवून पेटतोय कधीचा
श्वासांनी मारशी फूंकर कुठेवर


वादळाच्या गर्तेत झपाटलं जिवन
स्वप्नांचा धरीशी पदर कुठवर


देह माझा फासावर लटकला
मनात जपशी आदर कुठेवर


तो सुटला नाही प्रपंच्याचा गुंता
नव्या जोमानं घालशी भर कुठवर


धरूनी करताल काट्यांच्या शैयेवर
माझ्यासवे चालशी निरंतर कुठवरPost Options


@सनिल पांगे

No comments: