Saturday 17 May 2008

****अजून कुठे वापरलं, मी शब्दांना तलवारी सारखं***


भक्ष्याचं कुठे लक्ष्य केलं, मी उडत्या घारी सारखं
हत्यार नाही उपसलं, मी एका शिकारी सारखं


पाळत ठेवून आहे, चोरांच्या हरेक हालचालींवर
अजून कुठे वापरलं, मी शब्दांना तलवारी सारखं


व्याजावर पैसे दिलेत, मी हाडाचा पठाण आहे
समजू नका दिलेत मित्र होऊन उधारी सारखं


सुऱ्याला धार काढणारा, मी तो धारदार दगड
बोटं ती चिरणारच, का हाताळलं संगमवारी सारखं


नवसाला हाक देऊन, कालचं येऊन गेला दारी
भिक्षाही न दीली त्याला, ना वागवलं भिकारी सारखं


एक बोट दाखवताना, तीन बोटांची दिशा विसरतात
दुसऱ्यावर दोष लादताना, का वाटतं हुशारी सारखं


@सनिल पांगे

No comments: