Tuesday 4 September 2007

नशीबाच्या हातून हल्ली ठगत नाही

हल्ली मी मलाच शोधत नाही
कुठेच थांगपत्ता लागत नाही

पायांनी किती अंतर कापले
हातांच्या फेऱ्या वरून मोजत नाही

निवडुंग कुठेही जगतो म्हणून
तुळशी शेजारी कुणी लावत नाही

विदूषकाच्या देहात शिरताना हल्ली
दु:खांना सुखाने भागत नाही

तारा तुटताच नुसताच पाहतो
नशीबाच्या हातून हल्ली ठगत नाही

चालाख, जुगारी हातांशी हल्ली
हवा तसा पत्ता वागत नाही

फळ्यावर ब्रम्हज्ञान लिहीलं जरी
फळ्याच्या ज्ञानात भर पडत नाही

@सनिल पांगे

2 comments:

Unknown said...

kuni leehava tar aasa leehaav.....
ki vachnaryane pratyek shabdala wah wah mhanat rahaaava.........

tuza pankha(fan)
pankaj g.

manojsawkar said...

Respected Sir
I like your poems.

manoj sawkar.