Sunday 9 October 2016

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात हाय तू करू नकोस, एवढयात स्वप्नभंग दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात सावकाश घे टिपून एक एक रूपरंग गार गार या हवेत घेऊनी मला कवेत मोकळे करुन टाक एकवार अंतरंग ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग

@ Suresh Bhat

No comments: