Wednesday 5 December 2007

दाखवत नाहीस देवा, पण तुझेही हाल किती

दुःखाच्या बाजारात, भेटले दलाल किती

प्रत्येकजण विकतोय, अश्रूंचा माल किती


सुखाचा बाजार असा, ओसाडा का पडला

मोजकेच गिऱ्याईक, दलाल कंगाल किती


शुभ्र आकाशात, इंद्रधनूचे सप्तरंगी रंग

धरेशी निष्ठा राखतोय, रंग लाल किती


माझ्याशिवाय एकही, ना जीव घरात

भिंतीवर ह्या, जाड्याजुड्या पाल किती


जिवना जरी नाही, घेतलीस एकदाही परीक्षा

माझ्या मागे लागले, अपयशी निकाल किती


खांद्यावर खेळवलं, त्यांनीच खांदा नाकारला

शेवटल्या घडीला, भाग्य बदलते चाल किती


इतके दुःखी जिव, तारणारा तू एकटा

दाखवत नाहीस देवा, पण तुझेही हाल किती


तुझे डोळे भरले, कितींचे हात सरसावले

स्त्रियांचे सांत्वन करणारे, फुकटे रुमाल किती


@सनिल पांगे

No comments: